छत्रपती च का?
23 नोव्हेंबर 2019 वार शनिवार महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कोरून ठेवावा असा दिवस. ज्या काही घडामोडी झाल्या त्यात खोलात जाण्यात काही अर्थ नाही आणि या लेखाचा तो विषय ही नाही.
पण या सर्व सत्ता नाट्यामध्ये एक घटना आपण विसरून गेलो ती म्हणजे केंद्रीय कायदा व न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांची पत्रकार परिषद आणि त्यामध्ये त्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांचा केलेला एकरी उल्लेख ही गोष्ट सहसा कोणाच्या लक्षात आलं नसती पण ती आणून दिली छत्रपती संभाजी महाराज यांनी समाज माध्यमावर रविशंकर प्रसाद यांच्या नावासकट पोस्ट टाकून त्यांना माफी मागण्यास सांगितले. नंतर रविशंकर प्रसाद यांनी सारवा सारव केली पण स्पष्ट शब्दात माफी मागितली नाही.
आता काही जणांचा असा आक्षेप असू शकतो की हो म्हंटले असतील झालं असेल चुकून पण प्रश्न फक्त मान देण्याचा नसून प्रश्न मूल्यांचा आहे आपण कोणता इतिहास शिकलो आणि कोणता इतिहास आपण पुढच्या पिढीला हस्तांतरित करणार आहोत याचा आहे. का ओ तुमची अशी चूक पंतप्रधानपदाच्या बाबतीत होत नाही. कधी म्हंटला होता का तुम्ही नरेंद्र. तेंव्हा बरौबर “माननीय हमारे प्यारे प्रधानमंत्री जी नरेंद्र मोदी जी” निघत की. कारण तुम्हाला माहिती आहे तस नाही निघाल तर तुमच्या नावात एक छोटा बदल होऊ शकतो तो म्हणजे “माजी कायदा व न्याय मंत्री” .
पण चूक रविशंकर प्रसाद यांची नाही चूक आपली आहे . आपण महाराजांना महाराष्ट्राच्या बाहेर नीट पोहचवू शकलो नाही. कारण आपणच नीट महाराजांना समजून घेतलं नाही. किती जणांनी व्हॉटसअप च्या बाहेर महाराजांचं चरित्र वाचलं आहे. किती जणांच्या घरात महाराजांबद्दल एक तरी पुस्तक आहे . किती लोकांना महाराजांनी एवढे एवढे किल्ले जिंकले, अफजलखानाचा वध, शाएस्तेखनाची बोटे तोडली, आग्रा भेट , राज्याभिषेक या व्यतिरेक्त माहिती आहे.
वास्तविक महाराज फक्त या गोष्टीमुळे महान ठरत नाहीत. ते महान ठरतात त्यांनी त्यावेळच्या समाज व्यवस्थेत निर्माण केलेल्या स्वराज्याच्या संकल्पनेमुळे आणि ते मिळवण्यासाठी करावं लागत त्याची साधने वरील घटना आहेत.
ज्यावेळी लोकांना राष्ट्र हे कशा बरोबर खातात हेही माहिती नव्हत. अजून युरोप मध्ये राष्ट्र हो संकल्पना आकार घेत होती त्यावेळी महाराजांनी आपलं स्वतःच राष्ट्र असावं हे जनमानसात रुजवलं आणि त्यांना नाव दिलं स्वराज्य.
स्वराज्य या शब्दातच स्वतंत्र सामावलेल आहे. स्वतःसाठी स्वतःकडून स्वतःचे राज्य म्हणजे स्वराज्य. जे 1860 मध्ये अमेरिकेच्या यादवी युद्धात त्यावेळेच्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी Government of the people, By the people , and For the people अशी Government ची व्याख्या केली.
इतक्यात दूरदृष्टीचा राजा होता म्हणून छत्रपती, म्हणून महाराज म्हणून छत्रपति शिवाजी महाराज.
Suraj Patil

Comments
Post a Comment