स्पेशल थिअरी ऑफ रिलेटीव्हीटी



आपल्यापैकी खूप जणांनी ही थिअरी शाळेत असताना वाचलेली असते पण त्यावेळी ती समजलेली नसते किंवा नीट समजावून तरी सांगितली जात नाही. मला ही काही केल्या नेमक ह्या मध्ये काय आहे हे समजत नव्हतं . इंटरनेट वर ही खूप शोधुन पाहिलं पण मनाचा समाधान होईल असं काय सापडत नव्हतं . मराठी मध्ये तर खूप च कमी साहित्य उपलब्ध आहे पण जस जस अभ्यास करत गेलो तस कळायला लागलं आणि आता जरा समजल्या सारखं वाटतंय म्हणून समजावून सांगत आहे . (संपूर्ण थियरी मला समजली अस अजुनही  वाटतं  नाही)

१९०५ साली आईनस्टाईन ने एकदम सहा प्रबंध प्रकाशित केले  त्यामधील तीन हे क्रांतिकारक म्हणावे असेच होते ते म्हणजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट , ब्राऊनियन मोशन आणि तिसरा स्पेशल  थिअरी ऑफ रिलेटीव्हीटी.
पहिला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट या मध्ये आइन्स्टाईन ने प्रकाश ही लहर नसून प्रकाश कणांचा बनलेला आहे. हे कण म्हणजे फोटॉन अस तो म्हणे ...आणि ते त्याने गणिते मांडून सिद्ध ही केलं.
दुसरा ब्राऊनियान मोशन मध्ये त्याने एखाद्या द्रव्यामध्ये होणारी अनाकलनीय हालचाल का होते हे स्पष्ट केलं . त्या द्रव्यामधे असणारे रेणू हे एक मेकावर आदळून ही हालचाल होते हे त्याने सिद्ध केलं.
तिसरा प्रबंध हा खूप च युगप्रवर्तक असा म्हणवा लागेल कारण त्याने न्यूटन पासून चालत आलेलं अभिजात भौतिकशस्त्रात च बदलून टाकलं. तीच म्हणजे स्पेशल  थिअरी ऑफ रिलेटीव्हीटी.
तर हे रिलेशन आहे तर कशाच ....ते आहे वेग वेळ आणि अंतर यांचं. आपल्याला हे तर नक्की माहिती आहे की वेळ आणि वेग आपण कसा ही कोठे ही  मोजला तरी तो सारखा च येणार आहे ...म्हणजे भारत मध्ये १ मीटर हे अंतर अमेरिकी मध्ये बदलणार नाही किंवा चंद्रावर जरी गेलं तरी बदलणार नाही . वेळे च ही तसच आहे ...पण वेगाचं तस नाही...समजा अ हा व्यक्ती एका रेल्वे मध्ये बसलाय आणि त्याचा वेग ५० किमी प्रति तास आहे ...तसाच ब हा व्यक्ती दुसऱ्या रेल्वे त बसलाय आणि त्याचा वेग पण ५० किमी प्रति तास आहे . जर ह्या दोन्ही रेल्वे एकाच दिशेनं एकमेकाशी समांतर जात असतील तर त्या दोघांना ते दोघे स्थिर असल्याचा भास होईल ...आणि जर त्या दोन रेल्वे एकमेकाच्या विरूद्ध दिशेने जात असतील तर अ ला ब हा व्यक्ती दुप्पट वेगानं जात असल्याचं जाणवेल. त्यामुळे वेग हा फ्रेम ऑफ रेफरन्स वर अवलंबून असतो म्हणजे तो सापेक्ष असतो अस न्यूटन पासून च भौतिकशास्त्र शिकवत आलेलं होत...पण इथे आइन्स्टाईन चा प्रवेश होतो आणि तो सांगतो की वेळ आणि अंतर सापेक्ष आहे वेग नाही.
म्हणजे वेळ आणि अंतर हे जर वेगवेगळ्या वेगाने मोजल तर वेळ आणि अंतर हे दोन्ही वेगळे येतील. प्रत्येकाच्या हातातील घड्याळ व मोजपट्टी ही सारखी असणार नाही ती अवलंबून असेल त्या माणसाच्या वेगावर ...पण मग आपल्याला सगळीकडे वेळ आणि अंतर हे समान कसं काय जाणवत ???  नाहीतर धावण्याच्या शर्यतीत निकाल च लावता आला नसता ...प्रत्येक जण माझं च घड्याळ बरोबर आणि माझी च पट्टी बरोबर म्हणत बसला असता ... तस होत नाही ह्याचा कारण म्हणजे आपण वेळ आणि अंतर हे ज्या वेगाशी तुलना करून काढतोय तो वेग हा खूप च कमी आहे. तो वेग जर प्रकाशाच्या वेगा इतका असेल तर च आपल्या घड्याळात आणि पट्टी त पडणारा फरक आपल्याला जाणवला असता...
आइन्स्टाईन ने एक समीकरण   Lv = Lo√1-(v^2/c^2) आणि त्यानं दाखऊन दिले की जर आपण प्रकाशाच्या वेगाने जर गेलो तर वेळ थांबते ...आणि जर आपण त्याही पेक्षा जास्त वेगानं गेलो तर आपण भूतकाळात ही जाऊ शकतो...यामध्ये त्याने स्पेस आणि टाईम हे वेगळे नसून एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचं मांडून दाखवलं.
वेळ ही थांबू शकते फक्त आपल्याला प्रकाशाच्या वेगाने  जावं लागेल...

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती नेमकी कधी ???