शिवजयंती नेमकी कधी ???

आज २५ एप्रिल २०२० म्हणजेच मराठी कॅलेंडर प्रमाणे वैशाख शुक्ल द्वितीया शके १९४२. आपण आज शिवजयंती साजरी करतोय ती तिथीप्रमाणे. आज खूप जणांचे स्टेटस बघितले आणि वाटलं की आपल्याला जे माहिती  आहे ते सांगावं शेवटी तुम्ही च ठरवा शिवजयंती कधी साजरी करायची.
आज जी तारीख आहे वैशाख शुक्ल द्वितीया या दिवशी महाराजांचा जन्म झाला या बद्दल जो पुरावा दिला जातो तो म्हणजे मल्हार रामराव चिटणीस याची बखर. बखर म्हणजे रोजनिशी. सुमारे १८१८ साळी चिटणीस यांनी पहिल्यांदा जगासमोर शिवाजी महाराजांची जन्मतिथी जगासमोर आणली. या बखरी चा आधार घेऊनच अनेक इतिहास संशोधकांनी ही तिथी मान्य केली. कारण दुसरा काहीही पुरावा नव्हता.

 लोकमान्य टिळकांनी  पहिल्यांदा शिवजयंती सार्वजनिक रित्या साजरी केली आणि त्यासाठी त्यांनी आधार याच बखरी चा घेतला. आणि तेंव्हा पासून एप्रिल महिन्यात शिवजयंती साजरी होऊ लागली. इथे पर्यंत कोणताही वाद नव्हता. नंतर टिळकांना अटक झाली तुरुंगवास झाला शेवटी 1914 ला त्यांची सुटका झाली त्यानंतर त्यांनी शिवजयंती विषयी सखोल अभ्यास करायचं ठरवल आणि त्यांना जेधे शकावली मिळाली त्यामध्ये शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी वर फाल्गुन वैद्य तृतीया शके 1951 आढळली  आणि मग इथून वादाला तोंड फुटले.

 शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेधे यांना मावळ भागाची देशमुखी मिळाली होती. त्या बरोबर च मित्यांची नोंदी करायचे काम पण ते करत होते. पहिली नोंद त्यांनी कार्तिक वैद्य शके १५४० अशी औरंगजेबाच्या  जन्माची केली आहे. त्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांची जन्माची नोंद फाल्गुन वैद्य तृतीय शके १५५१ अशी केली आहे जी आपण १९ फेब्रवारी 1630 अशी घेतो.

आता जेधे शकावली व मल्हार रामराव चिटणीस यांच्यामध्ये जेधे शकावली हि चिटणीस यांच्या बखरी पेक्षा अस्सल पुरावा ठरते कारण जेधे हे शिवाजी महाराजांना समकालीन आहेत आणि त्यांचं काम च मीत्यांची नोंदी करणे हे आहे . त्याविरुद्ध चिटणीस हे 200 वर्ष उत्तरकालीन आहेत. पण काही आडमुठे इतिहास संशोधक जेधे शकावली मान्य करायला तयार होत नव्हते. अशी काही वर्षे गेली. त्यानंतर तंजावर मध्ये एक शिलालेख सापडला त्यामध्ये शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी वर फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 होता. या शिलालेखाच्या आधारावर परमानंद नावाच्या एका कवीने हीच तारीख घेतली आहे. नंतर संशोधनाअंती असे आढळते की परमानंदाने या शिलालेखावरून ती तारीख घेतली नसून परमानंदाच्या कवितेवरून हा शिलालेख बनवण्यात आला आहे.
आता प्रश्न असा पडतो की हा परमानंद कोण. याबद्दल संशोधन चालू झाले व असं कळाल कि हा परमानंद शिवाजी महाराजांच्या दरबारातील कवी होता जो शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून कविता करत असे. त्यामुळे जेधे शकावली मधील तारीख म्हणजेच फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 लास तारखेला शिवाजी महाराजांचा जन्म झाला हे सिद्ध होते.

आज जे आपण जयंती साजरी करतो त्याला फक्त मल्हार रामराव चिटणीस यांच्या बखरी वरून करतो. त्याला कोणताही आधार अजूनही सापडला नाही.

आता तुम्हीच ठरवा की कोणती जयंती साजरी करायची, कोणतेही करा पण दोन जयंत्या का साजरी करतो हे कळावं म्हणून ही खटपट.
                                                                           सुरज पाटील

Comments

Popular posts from this blog

स्पेशल थिअरी ऑफ रिलेटीव्हीटी