स्पेशल थिअरी ऑफ रिलेटीव्हीटी
आपल्यापैकी खूप जणांनी ही थिअरी शाळेत असताना वाचलेली असते पण त्यावेळी ती समजलेली नसते किंवा नीट समजावून तरी सांगितली जात नाही. मला ही काही केल्या नेमक ह्या मध्ये काय आहे हे समजत नव्हतं . इंटरनेट वर ही खूप शोधुन पाहिलं पण मनाचा समाधान होईल असं काय सापडत नव्हतं . मराठी मध्ये तर खूप च कमी साहित्य उपलब्ध आहे पण जस जस अभ्यास करत गेलो तस कळायला लागलं आणि आता जरा समजल्या सारखं वाटतंय म्हणून समजावून सांगत आहे . (संपूर्ण थियरी मला समजली अस अजुनही वाटतं नाही) १९०५ साली आईनस्टाईन ने एकदम सहा प्रबंध प्रकाशित केले त्यामधील तीन हे क्रांतिकारक म्हणावे असेच होते ते म्हणजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट , ब्राऊनियन मोशन आणि तिसरा स्पेशल थिअरी ऑफ रिलेटीव्हीटी. पहिला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट या मध्ये आइन्स्टाईन ने प्रकाश ही लहर नसून प्रकाश कणांचा बनलेला आहे. हे कण म्हणजे फोटॉन अस तो म्हणे ...आणि ते त्याने गणिते मांडून सिद्ध ही केलं. दुसरा ब्राऊनियान मोशन मध्ये त्याने एखाद्या द्रव्यामध्ये होणारी अनाकलनीय हालचाल का होते हे स्पष्ट केलं . त्या द्रव्यामधे असणारे रेणू हे एक मेकावर आदळून ही हालच...