छत्रपती च का?

23 नोव्हेंबर 2019 वार शनिवार महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कोरून ठेवावा असा दिवस. ज्या काही घडामोडी झाल्या त्यात खोलात जाण्यात काही अर्थ नाही आणि या लेखाचा तो विषय ही नाही. पण या सर्व सत्ता नाट्यामध्ये एक घटना आपण विसरून गेलो ती म्हणजे केंद्रीय कायदा व न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांची पत्रकार परिषद आणि त्यामध्ये त्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांचा केलेला एकरी उल्लेख ही गोष्ट सहसा कोणाच्या लक्षात आलं नसती पण ती आणून दिली छत्रपती संभाजी महाराज यांनी समाज माध्यमावर रविशंकर प्रसाद यांच्या नावासकट पोस्ट टाकून त्यांना माफी मागण्यास सांगितले. नंतर रविशंकर प्रसाद यांनी सारवा सारव केली पण स्पष्ट शब्दात माफी मागितली नाही. आता काही जणांचा असा आक्षेप असू शकतो की हो म्हंटले असतील झालं असेल चुकून पण प्रश्न फक्त मान देण्याचा नसून प्रश्न मूल्यांचा आहे आपण कोणता इतिहास शिकलो आणि कोणता इतिहास आपण पुढच्या पिढीला हस्तांतरित करणार आहोत याचा आहे. का ओ तुमची अशी चूक पंतप्रधानपदाच्या बाबतीत होत नाही. कधी म्हंटला होता का तुम्ही नरेंद्र. तेंव्हा बरौबर “माननीय हमारे प्यारे प्रधानमंत्री जी नरेंद्र ...